जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची (Stock Market) घसरण सुरूच.

 जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची (Stock Market) घसरण सुरूच.

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत): 24 मार्च रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात विक्री सुरू राहिल्याने बाजाराची घसरण चालूच राहिली. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्राच्या गडबडीची चिंता कायम असल्याने (अमेरिकेतील 186 बँका अडचणीत आहेत) गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेतला.

FII ची विक्री, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदार गोंधळून गेले (यूएस फेडरल बँक मार्च 2022 पासून आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहे).त्यातच ट्रेडर्सना मोठा झटका देत सरकारने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वाढवण्याची घोषणा केली. तसेच म्युचल फंड मधील टॅक्स बदल या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारावर झाला.

शुक्रवारी रात्री उशिरा ऑप्शन्स ट्रेडवरील विक्री वरील (STT) संदर्भात टायपिंग मध्ये चूक झाल्याचे वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांनी जाहीर केले.भारतीय बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता वाढताना दिसत आहे. कारण फेडच्या निर्णयानंतर आरबीआयवर व्याजदर वाढवण्याचा दबाव असेल.

विदेशी गुंतवणूकदार पैसे बाजारातून काढतील तसेच महागाईचा धोका वाढेल व रुपयातील घसरण वाढेल. या भीतीमुळे गुंतवणूकदार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आरबीआयची बैठक 4 ते 7 एप्रिल आहे.
अमेरिकन बँकांवरील संकटाचा परिणाम भारताच्या आयटी क्षेत्रावरही होताना दिसत आहे . अमेरिकन बँकांच्या दिवाळखोरीमुळे भारतातील अनेक स्टार्टअप्सचा पैसा अडकला आहे.

शुक्रवारी यूएस स्टॉक्स उच्च पातळीवर बंद झाले.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक बाजारातील घडामोडींवर असेल अमेरिकेचे 30 मार्च व यूकेचे 31 मार्च रोजी GDP आकडे जाहीर होतील भारतीय बाजार 30 मार्च रोजी रामनवमी निमित्त बंद राहतील.

Technical view on nifty-

निफ्टीसाठी 16917-16850-16828 हे स्तर अत्यंत महत्वपूर्ण राहील हे स्तर जर तोडले तर निफ्टीत घसरण वाढू शकेल. निफ्टी 16747-16706-16662 पर्यंत पोहोचू शकेल.वर जाण्याकरिता निफ्टीला 17060-17100-17145हे स्तर पार करावे लागतील.

सलग दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक
सलग दोन दिवसांच्या तेजीला सोमवारी ब्रेक लागला,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला.बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या चिंतेने जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक, माहिती तंत्रज्ञान आणि भांडवली वस्तूंच्या समभागातील विक्रीमुळे मार्केट मोठ्या प्रमाणात घसरले. सेन्सेक्समध्ये 900 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली व 57,084.91 ची नीचांक्की पातळी गाठली.

शेवटच्या तासांत झालेल्या काही खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला दिवसाच्या नीचांक्की स्थितीतून सावरण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 360.95अंकांनी घसरून 57,628.95 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 111.60 अंकांची घट होऊन निफ्टीने 16,988.40 चा बंद दिला. Indices cut some losses but settled in the red on Monday
बाजाराची उसळी, सेन्सेक्स 445 अंकांनी वधारला
मंगळवारी भारतीय निर्देशांकांनी मागील सत्रातील तोटा पुसून टाकण्यात यश मिळवले.

आश्वासक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराची सुरुवात मजबूत झाली अस्थिरता असून सुद्धा संपूर्ण सत्रात मार्केटने तेजी टिकवली. या आठवड्यात होणाऱ्या फेडरल रिझर्व्ह धोरणाच्या बैठकीत दर वाढीला विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजरात तेजी पसरली. बँकिंग, भांडवली वस्तू आणि पॉवर शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 445.73अंकांनी वधारून 58,074.68 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 119.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,107.50 चा बंद दिला. Indices closed Tuesday’s session broadly higher

फेड दर निर्णयापूर्वी सेन्सेक्स, निफ्टी मध्यम वाढीसह बंद.

जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहावयास मिळाली. सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजाराने सुरुवातीचा बहुतेक नफा पुसून टाकला. परंतू अस्थिरता असून देखील बाजाराने पॉसिटीव्ह टेरिटरी मध्ये राहण्यात यश मिळवले. गुंतवणूकदारांचे लक्ष रात्री फेडरल रिझर्व्ह धोरण बैठकीच्या निकालाकडे होते.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 139.91 अंकांनी वधारून 58,214.59 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 44.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,151.90 चा बंद दिला. Indices ended broadly in the green territory ahead of the US Federal Reserve’s interest rate decision announcement
सेन्सेक्स 289 अंकांनी घसरला.

सलग दोन दिवसांची तेजी गुरुवारी थांबली. कमकुवत सुरुवातीनंतर बाजाराने सावरण्याच्या प्रयत्न केला,यूएस फेडरल रिझर्व्हने 25 बेस पॉईंट्सने व्याजदर वाढवल्याकडे दुर्लक्ष केले व ग्रीन टेरिटरी मध्ये गेला. परंतु शेवटच्या एका तासातील विक्रीने सगळं नफा पुसला गेला.युरोपीय बाजारातील कमकुवत ट्रेंड,बँकिंग, फायनान्शियल आणि आयटी समभागांतील विक्री यामुळे बाजार घसरला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 289.31अंकांनी घसरून 57,925.28 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 75 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,076.90 चा बंद दिला. Indices concluded Thursday’s volatile session in the red territory

सलग दुसऱ्या दिवशी घसरण

मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात अत्यंत शांतपणे झाली. बाजार नफा व तोटा याचना दिवसभर झुलत राहिला परंतु शेवटच्या तासातील विक्रीने निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर ओढले गेले. बाजाराच्या घसरणीची प्रमुख कारणे,यूएस फेडनंतर बँक ऑफ इंग्लंडने वाढवलेले दर, युरोपिअन बाजारातील कमजोरी,तसेच सुधारित वित्त विधेयकानुसार, डेट म्युच्युअल फंड मधील MFs) टॅक्स बदल व F&O करारांच्या विक्रीवरील वाढवलेला सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स.सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी घसरला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 398.18 अंकांनी घसरून 57,527.10 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 131.90 अंकांची घट होऊन निफ्टीने 16,945.चा बंद दिला. Indices ended Friday’s volatile session in the red territory.

(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
25 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *