बाजाराची ऐतिहासिक विक्रमी झेप.

 बाजाराची ऐतिहासिक विक्रमी झेप.

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवडयात बाजाराने पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘दूरसंचार आणि वाहन उद्योगासाठी दिलेले प्रोत्साहन(Cabinet clears relief package),Retail inflation,wholesale price inflation चे आकडे,Industrial production data, व विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय  बाजारातील वाढता ओघ, विक्रमी लसीकरण(India’s pace of vaccination has gained momentum since last month).या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी.
बाजार बंद होताना सेन्सेक्स व निफ्टीत घसरण परंतु मिडकॅप आणि स्मालकॅप कंपन्यांचे समभाग तेजीत. Sensex, Nifty end in the red; mid, small-caps outperform.
जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका सोमवारी भारतीय बाजाराला बसला. बाजार उघडताच सेन्सेक्स १४२ अंकांनी घसरला.गुंतवणूकदारांचा कल काही दिवस मोठ्या कंपन्यांचे (largecaps) समभाग विकून/नफावसुली करून चांगल्या  मिडकॅप(mid) आणि स्मालकॅप(smallcap) कंपन्यांचे समभाग घेण्याकडे दिसला.सोमवारी बाजाराचा consolidation चा मूड होता.. बाजार बंद होताना सेन्सेक्स १२७ अंकांनी घसरून  ५८१७७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १३ अंकांनी घसरून १७३५५ चा बंद दिला. Sensex, Nifty Close Lower.
Industrial production grows 11.5% in July on low-base effect.
मिड, स्मॉलकॅपच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे  सेन्सेक्स व निफ्टीचा सकारात्मक बंद. Sensex, Nifty end with mild gains; mid, smallcaps outperform.
मंगळवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. परंतु जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका भारतीय बाजाराला बसला गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफावसुली केली.investors took some money off the table. ऑगस्टमध्ये retail inflation 5.3 होते व आरबीआयच्या कम्फर्ट झोनमध्ये होते परंतु wholesale price inflation 11.39 टक्क्यांपर्यंत वाढल्याने महागाईबाबत चिंता बाजाराला सतावत होती. दिवसभरात बाजार एक विशिष्ट पातळीभोवती फिरत होता. Major global markets also witnessed selling ahead of the US inflation data that is expected to influence the Federal Reserve’s decision on the coronavirus stimulus. The market lost most of its gains in the last few hours of trade to end flat. Mid and smallcap indices hit their fresh record highs in intraday trade. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६९ अंकांनी वधारून  ५८२४७  या स्तरावर बंद झाला व निफ्टी २५ अंकांनी वधारून १७३८० चा बंद दिला.
चौफेर खरेदीमुळे बाजारात तेजी निर्देशकांनी दिला विक्रमी बंद . Sensex, Nifty end at record closing highs
बुधवारी बाजारात चहुबाजूनी झालेल्या मजबूत खरेदीमुळे निर्देशकांनी पुन्हा नव्या विक्रमाची नोंद केली. बाजारात शानदार तेजीचा माहोल  होता.बँकिंग,आय.टी.एनर्जी,मेटल,ऑटो,फार्मा या क्षेत्रात जोरदार खरेदी झाली.केंद्र सरकारकडून टेलिकॉम सेक्टरला मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने  टेलिकॉम कंपन्यांना रिलिफ पॅकेज देण्यासंबंधी घोषणा केल्याने या क्षेत्रातील समभागात सुद्धा तेजी पसरली.मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागात सुद्धा चांगलीच तेजी पाहावयास मिळाली.अमेरीकेतील महागाईच्या आकड्यात घट झाल्याने गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ वाढला. Investors embarked on across-the-board buying as risk appetite improved after the US inflation numbers soothed concerns over rising prices. दिवसभरात सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५८,७७७ व १७,५३२ चा विक्रमी स्तर नोंदवला.Sensex and the Nifty hit their fresh record highs of 58,777.06 and 17,532.70 in intraday trade. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४७६ अंकांनी वधारून  ५८७२३  या स्तरावर बंद झाला व निफ्टी १३९ अंकांनी वधारून १७५१९ चा बंद दिला.
Dabur hikes prices of hair oil brands by 2-7.5%
Cabinet clears relief package for telcos and Rs 26,058-crore PLI scheme for auto and drones sector. 100 percent FDI in telecom via the automatic route was approved by the cabinet. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘दूरसंचार आणि वाहन उद्योगासाठी प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मंजुरी दिली.
 
बँकिंग व एफएमसीजी समभागातील  तेजीमुळे सलग तिसऱ्या दिवशी बाजाराचा विक्रमी बंद. Sensex, Nifty Close At Record High For Third Session Aided By Gains In Banking, FMCG Stocks.
जागतिक बाजाराच्या समाधानकारक सुरुवातीच्या जोरावर, वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात नव्या विक्रमाने झाली. बाजाराची विक्रमी मालिका सुरूच राहिली. FMCG,ऑइल,गॅस,ऑटो क्षेत्रात तेजी होती. खास करून बँकिंग क्षेत्र  (banking stocks, especially the public sector banks)या क्षेत्रांतील तेजीमुळे बाजाराचा मूड सुधारला.वरच्या स्तरावर नफावसुली होऊन देखील बाजाराने पुन्हा उसळी घेतली(After a positive start, the Sensex briefly slipped into the red in the early hours of trade. However, it bounced back).सेन्सेक्सने प्रथमच ५९,०००  व निफ्टीने १७,६०० चा टप्पा पार केला.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४१८ अंकांनी वधारून  ५९१४१ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ११० अंकांनी वधारून  १७६२९चा बंद दिला.
 
BSEमधील  सूचीबद्ध कंपन्यांचे ‘मूल्यांकन $ 3.54tn वर पोहोचल्याने  कदाचित जागतिक पातळीवर भारत पाचव्या क्रमांकावर गेला असे मत  सीईओ आशिष चौहान यांनी व्यक्त केले. India crossed market cap of $3.54 trillion on Sept 16,2021.
 
Sensex and the Nifty snap their 3-day winning run as investors booked profit after a stellar record-setting spree in the market.
शुक्रवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. दिवसभरात बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला. विदेशी गुंतवणूकदारांची  बाजारातील सक्रियता. जीएसटी कौन्सिलची बैठक, विक्रमी लसीकरण या जोरावर मार्केटमध्ये चांगलीच तेजी झाली.बाजाराच्या चमकदार कामगिरीनंतर सुद्धा वरच्या स्तरावर नफावसुली झाली.बाजार बंद होताना सेन्सेक्स १२५ अंकांनी घसरून  ५९०१५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४४ अंकांनी घसरून १७५८५ चा बंद दिला.
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com  
ML/KA/PGB
18 Sep 2021
 

mmc

Related post