फेडच्या व्याजदर कपातीच्या घोषणनेनंतर बाजाराची गगनभरारी

जितेश सावंत

मागील आठवडा भारतीय बाजारासाठी संस्मरणीय ठरला. यूएस फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक काळातील पहिल्या व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराने जागतिक ट्रेंडशी ताळमेळ साधत नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजाराने तूफान तेजी अनुभवली. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 84,694.46 आणि 25,849.25 हे नवे उच्चांक गाठले. आठवड्यात दोन्ही बेंचमार्क प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले. फेडच्या भूमिकेमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढला असून, डिसेंबरमधील बैठकीत हा निर्णय होऊ शकतो, या आशेने बाजारात तेजी पसरली.

मागील आठवड्यात बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानने व्याजदरात बदल केला नसला, तरी याचा भारतीय बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. फेडची भूमिका आणि एफआयआयची मजबूत खरेदी यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदार यूएस जीडीपीचे आकडे, फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांचे भाषण आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस पीएमआय फ्लॅश डेटा यावर लक्ष केंद्रित करतील. तसेच पुढील आठवड्यात सप्टेंबर फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टची मासिक मुदत संपत असल्याने, त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
The Indian stock market hit new all-time highs after the US Federal Reserve announced its first rate cut in over four years. Both the Sensex and Nifty surged by 2%, with strong global cues driving momentum. Investors are now focusing on key economic data from the US, and the upcoming monthly expiry of September contracts. Key resistance levels in Nifty could signal further upside if breached.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 25791
Key Support Levels: 25688-25565—25528-25497-25470-25427-25356.5-25338-25303-25269-25235.9-25199- 25152-25101-
25078-25031-24993-24950-24904-24,880-24845-24823.15,24,817-24,789-24,754-24736-24724-24717-24,686-24,631-24,619-24,587-24,530.9-24,502.Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels: 25849-25951- and 26051-26111-26200 These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

Author Information:

लेखक:शेअरबाजार आणि सायबरकायदा तज्ञ आहेत

ईमेल:jiteshsawant33@gmail.com

X(ट्विटर):@JiteshSawant

फेसबुक पेज: Jitesh Sawant

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *