चार आठवड्याच्या तेजीनंतर बाजाराची (Stock Market) विश्रांती

 चार आठवड्याच्या तेजीनंतर बाजाराची (Stock Market) विश्रांती

मुंबई, दि. 28 (जितेश सावंत):  गेले चार आठवडे तेजीत राहिल्यानंतर आणि विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 28 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार विश्रांती घेताना दिसला.संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात वाढताना दिसली,मिश्र तिमाही निकाल आणि ईसीबी(ECB) आणि यूएस फेडने(US Fed.) वाढवलेला व्याजदर (interest rate hiked by the ECB and the US Fed) तसेच एफआयआय ची (FIIs turning net sellers) विक्री यामुळे मान्सूनची चांगली प्रगती असून देखील बाजारात घसरण झाली. चार आठवड्याच्या तेजीनंतर बाजाराची (Stock Market) विश्रांती

बाजार सध्या Consolidation च्या मूड मध्ये आहे. येणाऱ्या काळात फेडरल रिझर्व्हने दर वाढीसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत असे नमूद केले आहे.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष तिमाही निकाल तसेच 31 July रोजी जाहीर होणाऱ्या fiscal deficit च्या आकड्यांकडे असेल.
शुक्रवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले, तर युरोपीय बाजारातही तेजी दिसून आली. Technical view on nifty बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता वाढताना दिसली.
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने बाजारात घसरण झाली.

शुक्रवारी निफ्टीने 19563 चा नीचांक गाठला.(सपोर्ट स्तर /मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे ) व 19646 चा बंद भाव दिला.
निफ्टीसाठी 19562 – 19493 हे महत्वपूर्ण सपोर्ट स्तर राहतील हे तोडल्यास निफ्टीतील घसरण वाढेल व निफ्टी 19433-19385-
19361-19327-19300-19246 हे स्तर गाठेल.

आठवड्याची सुरुवात नकारात्मक झाली.
जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी देशांतर्गत बाजार अस्थिर राहिले.त्याचप्रमाणे, कंपनीच्या संचालक मंडळाने हॉटेल व्यवसायाच्या डिमर्जिंगला तत्वतः मान्यता दिल्यानंतर इंडेक्स हेवीवेट ITC 4 टक्केघसरला म्हणून बाजारात घसरण
वाढली. दिवसभराच्या
अखेरीस सेन्सेक्स 299.48 अंकांनी घसरून 66,384.78 वर बंद झाला.

दुसरीकडे निफ्टीत 72.65 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,672.35 चा बंद दिला. Negative start to the week
बाजाराचा अस्थिरतेमुळे सपाट बंद जागतिक
बाजारातील संमिश्र ट्रेंड आणि इंट्रा-डे ट्रेडमधील अस्थिरता यामुळे आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार स्थिर पातळीवर बंद झाले.

दलाल स्ट्रीटचे लक्ष 26 जुलैच्या मध्यरात्री जाहीर होणाऱ्या फेडच्या व्याजदर निकालाकडे असल्याने बाजारात अधिरता जाणवली.दिवसभराच्या
अखेरीस सेन्सेक्स 29.07 अंकांनी घसरून 66,355.71 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 8,25 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,680.60.चा बंद दिला. Sensex ends flat in choppy trade

सेन्सेक्स मधील 3 दिवसांची घसरण थांबली
मागील सत्रातील
( मंगळवारच्या) निराशेनंतर, बुधवारी सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे भारतीय इक्विटी निर्देशांक अर्धा टक्का वाढले.
सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजारातील तेजी वाढली आणि बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला.

सेन्सेक्स मधील 3 दिवसांची घसरण थांबली.लार्सन अँड टुब्रो आणि टाटा मोटर्सच्या मजबूत Q1 कमाईमुळे
(strong Q1 earnings from Larsen & Toubro and Tata Motors) आणि रात्री यूएस FOMC बैठकीच्या निकालापूर्वी (US FOMC meet outcome) बाजरात एक मजबूत सत्र पाहावयास मिळाले.आयटी आणि बँक समभागांमध्येही खरेदी दिसून आली.

दिवसभराच्या अखेरीस
सेन्सेक्स 351.49 अंकांनी वधारून 66,707.20 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 97.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,778.30 चा बंद दिला. Sensex snaps 3-day losing streak

बुल्स बाजारावर पकड राखण्यात अपयशी ठरले
बुधवारी रात्री जाहीर झालेल्या यूएस फेडच्या दरवाढीकडे दुर्लक्ष करून सकारात्मक आशियाई बाजारांमुळे भारतीय इक्विटी निर्देशांकांची दिवसाची सुरुवात मजबूत झाली. परंतु सत्राच्या मध्यभागी उच्च स्तरावर झालेल्या नफा वसुलीमुळे बाजार घसरला व दुपारनंतर घसरण वाढत गेली.
निर्देशांकांनी मागील सत्रातील नफा पुसून टाकला. दिवसभराच्या
अखेरीस सेन्सेक्स 440.38 अंकांनी घसरून 66,266.82 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 118.40 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,659.90 चा बंद दिला. Bulls fail to hold grip .

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री तसेच देशांतर्गत बाजारात आयटी आणि बँक समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तोट्यासह बंद झाले.
दिवसभराच्या अखेरीस
सेन्सेक्स 106.62 अंकांनी घसरून 66,160.20 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 13.90 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,646 चा बंद दिला. Market ends marginally lower

( लेखक शेअरबाजारतज्ञ,
तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
28 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *