स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 पदांसाठी भरती

 स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 पदांसाठी भरती

job career

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने सेल मॅनेजमेंट ट्रेनी (तांत्रिक) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार SAIL च्या अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील:

सर्वसाधारण: 103 पदे
OBC: 67 पदे
EWS: 24 पदे
SC: 37 पदे
ST: 18 पदे
एकूण पदांची संख्या: 249
शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल आणि मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी :

जास्तीत जास्त 28 वर्षे

शुल्क:

सामान्य / OBC (NCL) / EWS : रु 700
SC/ST/PWBD/विभागीय उमेदवार: 200 रु
पगार:

निवडीनंतर उमेदवारांना 50 हजार रुपये वेतन मिळेल.
एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहायक व्यवस्थापक म्हणून पदस्थापना केली जाईल. त्यांचा पगार 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत असेल.
निवड प्रक्रिया:

GATE 2024 परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्या आधारे निवड केली जाईल.

याप्रमाणे अर्ज करा:

अधिकृत वेबसाइट sail.ucanapply.com वर जा .
मुख्यपृष्ठावर उपस्थित असलेल्या भरती लिंकवर क्लिक करा.
सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
फी ऑनलाईन भरा.
फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंट काढून ठेवा.

Steel Authority of India Recruitment for 249 Posts

ML/ML/PGB
6 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *