रेल्वेतील टॉवेल, बेडशीट चोरल्यास होऊ शकतो तुरुंगवास
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. मात्र, काही व्यक्ती प्रवास संपल्यानंतर या वस्तू घरी घेऊन जातात.आता ट्रेनमध्ये मिळणारे बेडशीट आणि टॉवेल तुम्ही घरी घेऊन जाणं चांगलंच महागात पडणार आहे. आतापर्यंत रेल्वेचे 14 कोटी रुपयांचे टॉवेल आणि बेडशीट चोरीला गेले आहेत.त्यामुळे यापुढे असा प्रकार घडल्यास रेल्वे कडक कारवाई करणार आहे.
रेल्वे मालमत्ता कायदा 1966 अंतर्गत ट्रेनमधून माल चोरीच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा प्रकरणात या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि एक हजार रुपये दंडही होऊ शकतो. तुरुंगवासाची शिक्षा 5 वर्षांपर्यंत वाढू शकते.
जेव्हा तुम्ही एसी कोचमधून प्रवास करत असता तेव्हा रेल्वेच्या बेडरोलमध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशाचे कव्हर आणि एक टॉवेल समाविष्ट असतो. मात्र, आता रेल्वेकडून टॉवेल क्वचितच पुरवले जातात. तर, एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांनाच बेडरोल दिला जातो.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये 1.95 लाख टॉवेल, 81,776 बेडशीट, 5,038 पिलो कव्हर आणि 7,043 ब्लँकेट चोरीला गेले. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात बेडरोलच्या वस्तूंची चोरी होते. या वस्तूची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे समजते. अशा परिस्थितीत, लोकांची चोरी होऊ नये म्हणून रेल्वेने प्रवास संपण्यापूर्वी अर्धा तास आधी बेडरोलच्या वस्तू जमा करण्याचा सल्ला दिला होता.
SL/KA/SL
22 Dec. 2023