‘जय जय महाराष्ट्र माझा’ आता राज्यगीत
मुंबई,दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी महाराष्ट्र दिनी आणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्राचे गौरव गीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ! कवी राजा बढे लिखित व संगीतकार श्रीनिवास खळे (Composer Srinivas Khale)यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहीर साबळे (Shaheer Sable)यांनी त्यांच्या खणखणीत आवाजात गाऊन अजरामर केले आहे. या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येत आहे.
या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा दिला जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. या गीताला राज्यगीतचा दर्जा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असा ठराव केंद्रीय पातळीवर घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.
SL/KA/SL
31 Jan. 2023