मालवण समुद्रावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला…
सिंधुदुर्ग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे सहा महिन्यापूर्वी उभारलेला शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज कोसळला. सहा महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथील या पुतळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी लाख्खो शिवप्रेमींनी भेटी देऊन या पुतळ्याचे दर्शन घेतले होते. मात्र आज हा पुतळा कोसळला असल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचे सांगितले. संबंधितांवर त्वरित एफ आर आय नोंदवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
ML/ML/SL
26 August 2024