अमेरिकेत उष्णतेमुळे वितळला अब्राहम लिंकन यांचा पुतळा
वॉशिग्टन डिसी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक उष्णतेच्या लाटेचा फटका महासत्ता अमेरिकेलाही बसत आहे. अमेरिकेत सध्या उष्णतेचा प्रकोप सुरू असून अनेक भागातील तापमान ४० डिग्री सेल्सिअस पार झाले आहे. दरम्यान वाशिंगटन डीसीमधून एक आश्चर्यचकीत करणारा प्रकार समोर आला आहे. येथे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचा ६ फुटी मेणाचा पुतळा वितळला आहे. वितळल्याने लिंकन यांच्या पुतळ्याचा आकार पूर्णपणे बिघडला आहे. वाशिंगटन डीसीमधील एका प्राथमिक शाळेच्या बाहेर अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा बसवला होता.
उष्णतेमुळे लिंकन यांच्या मूर्तीचे शीर वितळले व शरीरापासून वेगळे झाले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाशिंगटन डीसीमध्ये शनिवारी ३८ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मेणाचा पुतळा इतकी उष्णता सहन करू शकला नाही व वितळायला सुरूवात झाली. या ठिकाणाला लिंकन मेमोरियल नावाने ओळखले जाते. हा पुतळा मेणापासून बनवला होता, जो उष्णतेने वितळला आहे. सर्वात आधी पुतळ्याचे शीर वितळून पडले, त्यानंतर एक पाय वेगळा झाला त्यानंतर दुसरा पाय शरीरापासून वेगळा झाला. ज्या खुर्चीवर लिंकन बसले आहेत. तीही वितळून खाली गेली आहे.
या घटनेबाबत DC च्या कल्चरल विभागाने सांगितले की, अमेरिकेत सध्या उष्णतेचा प्रकोप सुरू असून अनेक भागातील तापमान ४० डिग्री सेल्सिअस पार झाले आहे. लिंकन यांच्या पुतळ्यावर उष्णतेचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. अमेरिकेच्या अनेक भागात यंदा उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात ली आहे. अमेरिकन नागरिक गेल्या अनेक दशकातील सर्वाधिक उष्णतेची लाट यंदा अनुभवत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
SL/ML/SL
26 June 2024