राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये…

 राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये…

पनवेल, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात राज्यातील पहिले ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ पनवेल भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरू करण्यात आला. माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कक्ष सुरू करण्यात आला. यावेळी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर , आ. महेश बालदी हे सुद्धा उपस्थित होते.

यावेळी रामेश्वर नाईक यांनी पनवेल प्रमाणे राज्यभरात असे वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारणार असल्याची माहिती दिली. “आ. ठाकूर आणि आ.बालदी यांनी पनवेल शहरातील रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता मिळावी यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केल्यामुळे हा कक्ष सुरू होत असल्याचे,” यावेळी रामेश्वर नाईक म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदतनिधी पनवेल आणि उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी हे कक्ष उभारण्यात आले आहे.

“महात्मा फुले जीवनदायी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
संपूर्ण उपचार मोफत किंवा अत्यल्प दरात देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे पनवेलमध्ये उभारलेले हे वैद्यकीय सहाय्यता कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे पोर्टल या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार आहेत.” असे रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्ष यांनी यावेळी सांगितले.

ML/ML/SL
3 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *