राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी पुढे ढकलली
दिल्ली, दि. २९ (एमएमसीन्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आज होणार नसून संबधित घटना पिठातील एक न्यायाधीश सुट्टीवर असल्याने ती पुढे ढकलली गेली आहे. State power struggle hearing postponed
राज्यात तत्कालीन शिवसेनेला खिंडार पडून चाळीस आमदारांनी नवा नेता निवडला आणि महविकास आघाडी सरकार गडगडले. अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या दरम्यान आमदार अपात्रता, अविश्वास ठराव , नेता निवड आदी अनेक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत , त्यावर सुनावणी साठी घटनापीठ गठित झाले आहे.
या पिठाचे एक न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे सुट्टीवर असल्याने आज सुनावणी होऊ शकत नाही, याआधी दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकत्रितरित्या सूनावणीचे मुद्दे न्यायालयात सादर करावेत असे स्पष्ट करून आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.
ML/KA/SL
29 Nov. 2022