हिमवादळामुळे अमेरिकेत आणीबाणीसदृश स्थिती

 हिमवादळामुळे अमेरिकेत आणीबाणीसदृश स्थिती

वॉशिग्टन, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जग ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात असताना अमेरिका आणि कॅनडावर मात्र भयंकर अशा हिमवादळाचे संकट घोंगावत आहे. अमेरिकेतील सुमारे 20 कोटी जनता हिमवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. मोंटाना शहरात तापमान उणे ४५ अंशांपर्यंत घसरले असून प्रचंड थंडीमुळे देशाच्या बहुतांश भागात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील 60 टक्के लोकांना हिमवादळाचा फटका सहन करावा लागत आहे. या आपत्तीमध्ये  १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेपासून कॅनडा पर्यंत ३२०० किमी क्षेत्रात पसरलेल्या या वादळामुळे 105 किमी प्रतितास एवढ्या वेगाने वारे वाहत आहेत.विमानांची हजारो उड्डाणे रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. तर १५ लाखांहून अधिक घरांचा विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांना अंधारात रहावे लागत आहे.

अमेरिकीत अनेक शहरातील तापमान – 48 डिग्रीपर्यंत घसरलं आहे. अनेक ठिकाणी हिमवादळामुळे बर्फवृष्टी होत आहे.  मिशीगन आणि पेनसिल्हेनियामध्ये पुढील काही दिवसांत आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी समुद्रातील पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील चार दिवस अमेरिकेत निचांकी तापमान राहण्याची शक्यता तेथील हवामान विभागानं वर्तवली आहे. आठवड्याच्या अखेरीस देशातील विविध शहरांत २ ते ४ फूट बर्फ पडू शकतो असा अंदाज आहे.

एकूणच अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरीकांच्या  नववर्षाच्या उत्साहावर या हिमवादळामुळे पाणी पडले आहे.

SL/KA/SL

25 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *