अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला

 अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट सर्व पक्षीय शिष्टमंडळासह घेतली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज केलीState delegation visits PM for status of classical language .

छगन भुजबळ यांनी आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित केला होता, अडीच हजार वर्षांहूनही अधिक काळ मराठी भाषा जुनी असल्याचे पुरावे तज्ञ मंडळींनी दिले आहेत असं भुजबळ म्हणाले , असे असूनही अद्याप तो दर्जा मिळत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आशीष शेलार यांनी या मागणीला अनुमोदन दिले , आपण मंत्री असताना त्यासाठी प्रयत्न केले मात्र दिल्लीतल्या बाबुगिरीत ते अडकले असल्याचे ते म्हणाले. भास्कर जाधव , रवींद्र वायकर आदींनी यावर बोलण्याची संधी मागितली मात्र अध्यक्षांनी ती नाकारली.

ML/KA/PGB
27 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *