डिजीटल मीडिया संघटनेचे कोल्हापूरात राज्य अधिवेशन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन २८ व २९ जानेवारी रोजी कोल्हापूर सिद्धगिरी कणेरी मठ येथे होत असल्याची माहिती संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भेरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे हस्ते होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. महाराष्ट्र महागौरव व डिजीटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ यावेळी दिले जाणार आहेत.असे राज्य संघटक संजय जेवरीकर यांनी सांगितले . सचिन सावंत , पंडित मोहिते पाटील , आत्माराम नरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत मिशन चे महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्विकारले आहे.अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक-पत्रकार राजा माने यांनी दिली.
डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना ही देशातील इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातील सर्वांत मोठी संघटना आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ५ हजार ५०० डिजिटल चॅनेल, न्यूज वेब पोर्टल, प्रिंट मीडिया मधील संपादक, पत्रकार यांचा समावेश आहे. या डिजिटल मीडियाला मोठ्या प्रमाणात जगभरातुन प्रतिसाद मिळत आहे. या मीडियाला केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळावी, तसेच डिजिटल मीडियाच्या संपादक-पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरवठा
केला जात आहे,असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
State Convention of Digital Media Association at Kolhapur
ML/KA/PGB
25 Jan 2024