कोबाद गांधींच्या पुस्तकाला मिळालेला राज्य पुरस्कार विवादात
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम – तुरुंगातील आठवणी आणि चिंतन या अनुवादीत पुस्तकाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. नुकताच राज्य साहित्य पुरस्कारात अनुवादासाठीचा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावे दिला जाणारा 1 लाख रुपये रकमेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम – तुरुंगातील आठवणी आणि चिंतन या पुस्तकास जाहीर झाला आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक यांनी या पुरस्काराबाबत निषेध व्यक्त करणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
हे मूळ पुस्तक माओवादी कम्युनिस्ट पक्ष या बंदी असलेल्या फुटिरतावादी संघटनेचे पॉलिटब्युरो सदस्य असलेल्या कोबाड गांधी यांचे आहे.
2009 ते 2019 या 10 वर्षाच्या कारावासातून बाहेर आल्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिले. एकेकाळी नेपाळमधील माओवाद्यांशी घनिष्ट संबंध असलेल्या, भारतीय माओवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या आणि अनेक वर्षे सपत्निक आपल्या गडचिरोली जिल्ह्यात सक्रीय असलेल्या या माओवाद्याच्या विचारांना राज्य पुरस्कार बहाल करून त्याना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या शासकीय समितीच्या या निर्णयाचा अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र शब्दात निषेध केला आहे.
या पुस्तकाला पुरस्कार देण्याची शिफारस करणाऱ्या समितीचा हेतूही शंकास्पद वाटतो. त्यामुळे ही पुरस्कार समिती बरखास्त करून तातडीने नवी समिती गठित करावी आणि कोबाड गांधी यांच्या पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय साहित्य परिषदेने केली आहे.
State award for Kobad Gandhi’s book in controversy
ML/KA/PGB
9 Dec .2022