जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू निर्मितीचा स्टार्टअप, लाखोंची उलाढाल

पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या तरुणाईमध्ये टेक्नो स्टार्टअप सुरु करण्याची क्रेझ सुरु आहे.यामध्ये वेगळी वाट निवडत जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू उत्पादन करण्याचा ब्रँण्ड तयार केला आहे. पुण्यातील स्वप्नील जोशी या तरुणाने नवी पेठ येथे इको रेगेन (eco regain) नावाने ब्रँड तयार करून जुन्या वापरलेल्या जीन्सपासून सुंदर पर्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही 30 लाख ते 50 लाखांपर्यंत आहे
इको रेगेन आतापर्यंत 22 प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवले आहेत. यामध्ये ट्रॅव्हल्स बॅग, लॅपटॉप बॅग, पाऊच असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे बनवले जातात. हे बनवण्याचे काम ज्या गरजू महिला आहेत, त्यांना प्रशिक्षण देऊन त्या बनवतात. 6 महिला सध्या या उपक्रमात काम करत आहेत आणि महिन्याला 600 ते 800 बॅग बनवल्या जातात. 200 रुपयांच्या पाऊचपासून ते 2200 रुपयाच्या ट्रॅव्हल्स बॅग्सही इथे मिळतात.
2018 मध्ये याची स्थापना करण्यात आली आणि भारतातील हे असे पहिले स्टोअर आहे, जिथे जुने कपडे देऊन त्यापासून बनवलेले प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकतात. पुण्यातून आतापर्यंत 80 हजार किलो कपडे जमा केले असून त्यापासून 15 हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स बनवले आहेत.
SL/ML/SL
16 Oct 2024