जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला सुरुवात, जाणून घ्या यात्रेची वैशिष्ट्ये

 जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला सुरुवात, जाणून घ्या यात्रेची वैशिष्ट्ये

जगन्नाथपूरी, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओरिसाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेल्या पुरीच्या जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरूवात झाली. या यात्रेसाठी देश विदेशातून लाखो पर्यटक हजेरी लावतात आणि जगन्नाथाच्या रथाला ओढण्यासाठी हातभार लावतात. आज रात्री भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासह नगर भ्रमणासाठी ​​​​​​ निघतील. उद्या वाजता ते आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीचा मंदिरात पोहचतील आणि तेथे 9 दिवस मुक्काम करतील. त्यानंतर जगन्नाथ मंदिरात परततील. दरवर्षी प्रमाणे या यात्रेसाठी तीन भव्य रथ तयार करण्यात आले आहेत.

पहिल्या रथात जगन्नाथ, दुसऱ्या रथात बलराम आणि तिसऱ्या रथात सुभद्रा स्वार होणार होतात.रथ तयार करण्यासाठी 884 विशेष झाडांच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. पहिला कट सोन्याच्या कुऱ्हाडीने केला जातो. रथ निर्माते दिवसातून एकदाच साधे अन्न खातात. कारण या मंदिराची परंपरा अनोखी आहे.

या रथयात्रेबाबत एक धार्मिक गोष्ट मानली जाते. भगवान जगन्नाथ यांच्या बहीण सुभद्रा यांनी आपल्या भावांकडे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाऊ जगन्नाथ आणि बलभद्र यांनी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भव्य रथ तयार केला आणि त्यावर बसून शहर फिरायला निघाले. त्यानंतर दरवर्षी पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो.

दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला ही यात्रा सुरू होते. यानंतर, आषाढ शुक्ल पक्षाच्या 11 व्या दिवशी जगन्नाथाच्या परत येण्याने यात्रा समाप्त होते.

SL/KA/SL

20 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *