स्टार महाराष्ट्र अवॉर्डचा येत्या 18 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात रंगणार पुरस्कार वितरण सोहळा

 स्टार महाराष्ट्र अवॉर्डचा येत्या 18 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात रंगणार पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, दि १४
~ महाराष्ट्र राज्य ही भूमी इतिहास घडविणाऱ्या आणि राष्ट्र घडविणाऱ्या रत्नांची भूमी आहे. कला संस्कृती साहित्य सर्व क्षेत्रात समृद्ध असणारी ही भूमी आहे. संतांचा आणि महापुरुषांचा आदर्श घेऊन चालणारी महाराष्ट्र ही सर्वार्थाने समृद्ध भूमी आहे. शिक्षण कला साहित्य पत्रकारिता पोलिस प्रशासन समाजसेवा विज्ञान अध्यात्म योग क्रीडा नाट्य सिनेमा आणि राजकारण सहकार अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राला अधिक समृद्ध करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात आपापल्या क्षमतेने कार्यरत असणाऱ्या गुणीजनांना दरवर्षी साप्ताहिक स्टार महाराष्ट्र च्या वतीने स्टार महाराष्ट्र अवॉर्ड देऊन गौरविले जाते.यंदा स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025 चा शानदार सोहळा येत्या मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी मुंबईत प्रभादेवी दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

स्टार महाराष्ट्र अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार असून या सोहळ्यास खासदार उज्ज्वल निकम; रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष
आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर; माजी खासदार रामशेठ ठाकूर; भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ ;आमदार प्रसाद लाड तसेच आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात साप्ताहिक स्टार महाराष्ट्र तर्फे केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वैचारिक वारसदार म्हणून भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पत्रकारितेत योगदान देणाऱ्या निवडक पत्रकारांना स्टार महाराष्ट्र अवॉर्ड ने गौरविण्यात येणार आहे.त्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी; महाराष्ट्र टाईम्स चे पत्रकार सौरभ शर्मा; नवभारत चे वरिष्ठ पत्रकार अखिलेश कुमार मिश्रा; ए बी पी माझा च्या संपादक सरिता कौशिक; झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार; दैनिक सकाळ चे मुंबईचे ब्युरो चीफ विनोद राऊत; नवशक्ती चे संपादक प्रकाश सावंत; ज्येष्ठ पत्रकार प्रमोद डोईफोडे; पत्रकार प्रशांत बढे; पत्रकार रुपाली बडवे; पुण्य नगरी चे मुंबई संपादक विशाल राजे; दैनिक सम्राट चे संपादक कुणाल कांबळे; दैनिक लोकनायक चे बुद्धभूषण गोटे; संपादक संतोष कोठावदे; पत्रकार सुशांत पाटील; लोकसत्ता चे अशोक अडसूळ; राजू झनके;ॲड.स्मिता चिपळूणकर; आदी अनेक मान्यवरांना स्टार महाराष्ट्र अवॉर्ड ने गौरविण्यात येणार आहे.
साप्ताहिक स्टार महाराष्ट्र चा यंदा 14 वा वर्धापन दिन असून या निमित्त स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025 चा शानदार सोहळा मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मराठी आणि हिंदी नामवंत कलाकार सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.मराठी वाद्यवृंद आणि गाणी नृत्य लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025 चा मुख्य कार्यक्रम सायंकाळी 4.30 वाजता सुरू होईल. स्टार महाराष्ट्र अवॉर्ड सोहळ्यास येत्या दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन साप्ताहिक स्टार महाराष्ट्र चे संपादक हेमंत रणपिसे यांनी केले आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *