उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 122 लोकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात सोमवारी सत्संग समारंभाच्या समारोप प्रसंगी भयंकर गर्दी झाली. या घटनेत 122 जणांचा मृत्यू झाला. तर १०० लोकं जखमी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अव्यवस्थित व्यवस्थापन यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती मिळाली आहे. भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. सत्संगाचा समारोप होत असताना ही दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे.