कर्नाटकात जाणारी एस टी सेवा बंद
कोल्हापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कर्नाटकात जाणारी बस
सेवा गुरुवारीही बंद राहिली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गदग येथे महाराष्ट्र एसटी बसेसवर चढून दंगा केला. त्यामुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या ५४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ST services to Karnataka closed
यामुळे कोल्हापूर लाखांचा महसूल विभागाचा सुमारे चार लाखांचा महसूल बुडाला आहे. दरम्यान, बससेवा बंद असल्यामुळे खासगी वाहन चालकांनी सीमेवरील निपाणी शहरासाठी २५० रुपये भाडे आकारून प्रवासी वाहतूक सुरू ठेवली आहे.
मात्र,गोरगरीब नागरिक, एम आय डी सी तील कर्मचारी कामगार यांचे एसटी अभावी हाल होत आहेत. जोपर्यंत पोलिसांकडून सूचना मिळत नाही तोपर्यंत कर्नाटकात जाणारी बस सेवा सुरू ठेवणं उचित ठरणार नाही, असं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे.
ML/KA/SL
9 Dec. 2022