विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार ST चे पास

मुंबई, दि. 15: शालेय विद्यार्थ्यांना एसटीचे पास शाळेतच मिळणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी एसटी डेपोत जाण्याची गरज नाही. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जून 2025 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले, “नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा 16 जूनपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटीच्या माध्यमातून 66.66 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे फक्त 33.33 टक्के रक्कम भरून मासिक पास काढता येतो.आतापर्यंत विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात होता. पण आता एसटी महामंडळ “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहीम सुरू करणार आहे