एस टी ने टाकली कात , इलेक्ट्रिक बसचा ताफा दाखल

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बदलत्या काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता एसटीने देखील कात टाकली आहे. इलेक्ट्रीक एसी बस या प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध झाल्या आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं. एसटी महामंडळाच्या electric बस चा ताफा त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
मागील कित्येक वर्षापासून महाराश्ट्रातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रवाशांना सोय देत आहे. त्यामुळे एसटी ही लाईफलाईन असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले . गावकरी आणि एसटी यांच्यात एक ऋणाबंधाचे नाते आहे, ते पुढेही जपले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रदुषणमुक्त, पर्यावरणपूरक, वातानुकुलित तरीही किफायतशीर दरात धावणाऱ्या ई बसचे लोकापर्ण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील एसटीच्या खोपट डेपो येथे मंगळवारी करण्यात आले. एसटीच्या ताफ्यात यावेळी नवीन ५१५० ई बसचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
या ई बस बोरीवली – ठाणे – नाशिक या मार्गावर चालविल्या जाणार असून टप्यटप्याने राज्याच्या प्रत्येक भागात ही बससेवा सुरु होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यानी यावेळी व्यक्त केला. राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्गींग स्टेशनचे कामही सुरु झाले असल्याचं ते म्हणाले . ग्रामीण भागातील नागरीकासाठी एसटी ही लालपरी आहे. ग्रामीण भागातील प्रवासी आणि वाहक, चालक यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. जिथे कोणतेही वाहन पोहचत नाही, तिथे एसटी पोहचत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर ५ हजाराहून अधिक डिझेल बसचे देखील एल.एन.जी. मध्ये प्रवार्तीत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
ML/KA/PGB
13 Feb 2024