एकाच दिवसात ३५ कोटी रुपये कमावून ST महामंडळाने केला विक्रम
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्यांच्या लाडक्या लालपरीने एकाच दिवसात गेल्या ७५ वर्षातील एकदिवसात केलेली सर्वाधिक कमाई करून विक्रमी प्रस्थापित केला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाने काल (१६ नोव्हेंबर) ३५ कोटी १८ लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पनाचा (Proft) विक्रम रचला आहे.
दरम्यान यामध्ये पुणे (Pune) विभाग हे आघाडीवर आहे. पुणे विभागातून 21 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले आहे. त्याखालोखाल धुळे-नंदुरबार विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 21 कोटी 25 लाखांचे उत्पन्न एसटीने मिळवलंय. तसेच जळगाव विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 18 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
रग्रामीण भागात एसटी हा प्रवाश्यांमध्ये एक महत्त्वाचा वाहतूक स्रोत आहे. गेल्या काही वर्षांत अनेकदा एसटीवर आर्थिक संकंट कोसळलं होतं. पण यंदाची दिवाळी ही एसटी महामंडळासाठी देखील खास ठरली. भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 कोटी 35 लाख रुपयांचं उत्पन्न एसटीने कमावलं. ST Corporation made a record by earning Rs 35 crore in a single day
दिवाळीत एसटीचा प्रश्न मार्गी
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बंदच्या संपाची हाक दिली होती. पण त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ही संप मागे घेण्यात आला. दरम्यान मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
SL/KA/SL
17 Nov. 2023