आंदोलन मागे घेत एसटी महामंडळाची बस सेवा सुरू

 आंदोलन मागे घेत एसटी महामंडळाची बस सेवा सुरू

छ संभाजीनगर , दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मागील चार दिवसांपासून मराठवाड्यातील एसटी महामंडळाची सेवा पूर्णतः बंद होती ती आज अखेर सुरू करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणा दरम्यान सर्वात आधी एसटी महामंडळाच्या बसेस टार्गेट करण्यात आल्या होत्या. काही एसटी बस जाळल्या नंतर सोमवारी झालेल्या हिंसाचारात बीड बस स्थानकातील 70 बसेस वर दगडफेक झाली होती. तर विभागातील अनेक जिल्ह्यात हीच स्थिती होती. त्यामुळे बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि एस टी महामंडळाला बसला आहे.

दिवाळी सण तोंडावर असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ही सुरू आहेत. काल सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आल्यावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.ST Corporation bus services resumed after agitation

ML/KA/PGB
3 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *