आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेस रद्द
छ. संभाजी नगर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी बस पेटवून देण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य बस स्थानकातून काही बस रद्द करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकातून सिल्लोड, कन्नड, पैठण, बीड आणि जालना येथे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहे. तर, सिल्लोड आणि पुणे या महामार्गावरील बसेस सध्या सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच सर्व मार्गावरील स्थानिक पोलिसांशी आम्ही संपर्क करत असून, त्यांच्या सूचनेनुसार बस सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ML/KA/SL
29 Oct. 2023