अटल सेतू वरून एसटीची ” शिवनेरी ” धावणार…
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या ” अटल सेतू “वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) आणि स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत.
या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल , नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत दुपारी १ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय आणि दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
ML/KA/SL
19 Feb. 2024