वेरूळ घाटात एसटी बस घसरली, 24 प्रवासी बचावले

 वेरूळ घाटात एसटी बस घसरली, 24 प्रवासी बचावले

छ. संभाजीनगर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला असून छत्रपती संभाजी नगर ते नंदुरबार अशी प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अचानक मुख्य रस्ता सोडून घसरली. या बसमधून 20 ते 24 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची दूरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे सतत छोटे-मोठे अपघात होत असतात.
छत्रपती संभाजी नगर परिवहन मंडळाची अपघातग्रस्त एसटी बस नंदुरबार कडे जात होती. वेरूळ रस्त्यावरील घाटातील वळण रस्ता असल्यामुळे एसटी वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं बस घसरली असल्याचे समजते.

अचानक झालेल्या या अपघातामुळं बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. या अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत. चालती बस मुख्य रस्ता सोडून घसरली, त्यामुळे नागरिक धावत मदतीला गेले, त्यांनी प्रवाशांना बाहेर काढले.
काहींना मुका मार लागला. पण, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसचा वेग हळू होता. शिवाय या रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी खुलताबाद पोलीस दाखल झाले आहेत.

ML/KA/SL

4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *