एस टी अपघातात दहा ठार, तीस प्रवासी जखमी
नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई – आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात १० प्रवाशी जागीच ठार झाले आहे, तर ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. एसटी आणि ट्रकचा अपघात इतका भीषण होता की बस अक्षरशा हार्दिक आपली गेली आहे, अपघातातील जखमींना तातडीने चांदवड आणि नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसटी बस जळगावहून नाशिककडे जात असताना बसचे टायर फुटल्याने सदर बस ही ट्रकवर जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. बस आणि ट्रक या दोन्ही वाहनांचा स्पीड जास्त असल्याने बस अक्षरश: अर्धी कापली गेली आहे, त्यामुळे बसमधील १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सदर बस जळगावहून वसई विरारकडे जात होती.
या अपघातात ३० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी असल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी बस जळगावकडून नाशिककडे जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला, अशी माहिती समोर येत आहे, या भीषण अपघातात एसटीची एक बाजू कापली गेली. त्यामुळे अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. घटनास्थळावरील दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते. ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. मृत आणि जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे.
ML/ML/PGB 30 APR 2024