जिल्ह्याच्या निर्मिती मागणीसाठी श्रीरामपूर बंद
अहमदनगर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा व प्रशासकीय दृष्टया गुंतागुंतीचा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन करुन चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला श्रीरामपूर जिल्हा सरकारने जाहीर करावा या मागणीसाठी आज संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यासह शेजारील राहुंरी तालुक्यातील काही गावे सर्वपक्षीय बंद ठेवण्यात येत असून अनेकांनी PMO कार्यालयाला मेल करुन लक्ष वेधले आहे.Srirampur bandh for district formation demand
सर्वपक्षीय एकत्र येऊन प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्याचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका तसेच शेजारील राहुरी तालुक्यातील काही गावानी आपापले व्यवहार बंद ठेऊन बंदला पाठिंबा देत कडकडीत बंदमध्ये सहभाग घेतला आहे. सर्वपक्षीय संघटना, सामाजिक व अन्य संघटना या बंदमध्ये सहभागी आहेत.
ML/KA/PGB
17 Jun 2023