श्री योगेश्वरीदेवी मार्गशीर्ष महोत्सवाला सुरुवात
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
Sri Yogeshwaridevi Margashirsha Navratri begins Beed District
महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विपीन पाटील यांनी दिलीय.
३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत योगेश्वरी देवीच्या मंदिरात आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या परंपरेनुसार किमान ५ ते ७ हजार महिला सलग नऊ दिवस मंदिरातच निवासासाठी आराध राहून असतात.
या महोत्सवाच्या कालावधीत आराध राहणाऱ्या या महिलांची व्यवस्था योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने केली जाते. निवासव्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छता या बाबी समोर ठेवून मंदिर प्रशासनाची उपाययोजना सुरू आहे. तसेच महोत्सवाच्या कालावधीत दररोज किर्तन, प्रवचन, भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ML/KA/SL
30 Nov. 2022