श्री तुळजाभवानीची सिंहासन पूजा ऑनलाईन नोंदणी

तुळजापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात. श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर http://shrituljabhavani.org प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला सिंहासन पूजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करुन देण्यात येत होती. माहे जून 2023 या महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक करण्यात येत आहे.
सिंहासन पूजा नोंदणी 25 मे रोजी सकाळी 10.00 वा.पासून ते 28 मे पर्यंत सकाळी 10.00 वा.पर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 28 मे रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात येईल.
भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 28 मे रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 29 मे रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 29 मे रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे. भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.29 मे रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दि.30 मे रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल.Sri Tuljabhavani’s Throne Pooja Online Registration
प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 30 मे रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात येणार आहे. भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 30 मे रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 31 मे रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. माहे जून 2023 या महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी 31 मे रोजी सकाळी 11.30 वाजता प्रसिध्द करण्यात येईल.
भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ http://shrituljabhavani.org वरुन सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर http://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करुन भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
ML/KA/PGB
26 May 2023