श्रीलंकेमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी महिला विराजमान

श्री जयवर्धनेपुरा कोट्टे,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत 14 नोव्हेंबरला संसदीय निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांची आघाडी एनपीपीने विजय मिळवला होता. सोमवारी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. अमरसूर्या या श्रीलंकेत पंतप्रधानपद भूषवणाऱ्या तिसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी सिरिमाओ भंडारनायके (3 वेळा) आणि चंद्रिका कुमारतुंगा (1 वेळा) या देशाच्या महिला पंतप्रधान होत्या. 2020 मध्ये हरिणी अमरसूर्या पहिल्यांदाच खासदार झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी अमरसूर्या श्रीलंका मुक्त विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
अमरसूर्या यांनी 1991 ते 1994 या काळात दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. 5 वर्षांपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या. राष्ट्रपती झाल्यानंतर दिसानायके यांनी त्यांना पंतप्रधान केले.
2015 मध्ये त्या सरकारविरोधातील आंदोलनात सामील झाल्या. यादरम्यान, त्या दिसानायके यांच्या संपर्कात आल्या आणि 2019 मध्ये त्या जनता विमुक्ती पेरामुना या पक्षात सामील झाल्या. 2020 मध्ये संसदीय निवडणुका जिंकून त्या पहिल्यांदाच खासदार झाल्या.
SL/ML/SL
18 Nov. 2024