स्पृहा जोशीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

 स्पृहा जोशीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टिपिकल ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधुन बाहेर पडून अभिनेत्री स्पृहा जोशी आता एका वेबसिरिजच्या माध्यमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. याबाबत स्पृहाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ‘रणनीती’ सीरिजचे कथानक बालाकोट एअरस्ट्राइकवर आधारित आहे. वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, लारा दत्त आणि जिमी शेरगिल आहे. ही वेबसीरीज २५ एप्रिलला ‘जियो सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे.

स्पृहाने जिम्मी शेरगिलसोबत फोटो शेअर केलेला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या ‘रणनीती’ वेबसीरीजमध्ये साकारलेल्या छोट्याशा भूमिकेकरिता मला मिळालेले प्रेम आणि कौतुकाबद्दल मी सदैव ऋणी आहे.”

“जिमी शेरगिलसारख्या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाल्यावर आणि काय हवं? जिमीसोबत दुसऱ्यांदा काम करताना खूप मजा आली. सेटवरचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणारा आणि वेगळा अनुभव देणारा होता. एवढ्या चांगल्या टीमचा मला भाग होता आलं यासाठी मी आनंदी आहे. या सीरिजचा एकही एपिसोड चुकवू नका नक्की पाहा.” अशी पोस्ट स्पृहाने लिहिलेली आहे.

ML/ML/SL

3 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *