पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीड बोटीची प्रवासी लॉन्चला धडक…

 पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीड बोटीची प्रवासी लॉन्चला धडक…

अलिबाग दि २४– रायगड जिल्ह्यातील उरण जवळच्या समुद्रात प्रवासी बोटीला पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याची घटना घडली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवीत हानी झाली नाही.
मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावर अनेक वर्षांपासून प्रवासी लॉन्च सेवा सुरू आहे.

मोरा येथून शुक्रवारी रात्री आठ वाजता संत ज्ञानेश्वर ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन मुंबईच्या भाऊच्या धक्क्याला चालली होती. मात्र ही प्रवासी बोट मोरा बिकन आणि नेव्ही जेट्टीच्या दरम्यान आली असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास नेव्हीच्या स्पीड बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिली. मात्र सुदैवाने ही स्पीड बोट प्रवासी बोटीच्या कडेला घासली. जर ही धडक थेट बोटीच्या मध्य भागाला झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.

यावेळी या प्रवासी बोटीतून १० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळ उडाला होता. डिसेंबर २०२४ ला अशाच प्रकार निलकमल बोटीला नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिली होती. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. कालच्या घटनेने पुन्हा एकदा या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

मोरा येथून सुटणाऱ्या शेवटच्या लाँचला नेव्हीच्या जेट्टीजवळ नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली. या प्रवासी बोटीत १० प्रवासी होती. सुदैवाने यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. मात्र प्रवासी बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांना घेऊन ही बोट भाऊच्या धक्क्यापर्यंत सुरक्षितपणे आणण्यात आली.” असल्याचे सुशिल सातेलकर ,बंदर अधिकारी, भाऊचा धक्का यांनी सांगितले. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *