भारत आणि नेपाळदरम्यान प्रस्तावित रामायण सर्कीटच्या कामाला वेग
नवी दिल्ली, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांमअध्ये भारत आणि नेपाळदरम्यान प्रस्तावित रामायण सर्किटच्या कामावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील रामायण सर्किटचे काम वेगाने पूर्ण केले जाईल, असे जाहीर केले. रामायण सर्किटमध्ये भारत आणि नेपाळमधील रामायणाशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. पुढील वर्षी पूर्ण होणारे अयोध्या येथील श्रीराम मंदिर तसेच नेपाळमधील जनकपूर जे सीतेचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते.
या बैठकी दरम्यान सीमावाद आणि पायाभूत सुविधा विकास या विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान म्हणाले – नेपाळ-भारत भागीदारी हिट ते सुपरहिट करण्यासाठी मी आणि पंतप्रधान प्रचंड यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याशिवाय भारत आणि नेपाळमधील नेबरहुड फर्स्ट धोरणावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी जलविद्युत विकास, कृषी आणि कनेक्टिव्हिटी या विषयांवर चर्चा झाली. २०१४ मध्ये मी नेपाळला पहिल्यांदा भेट दिली होती. तेव्हा मी HIT म्हणजेच हिट फॉर्म्युला दिला होता. यामध्ये हायवे, आय-वे आणि ट्रान्स-वे यांचा समावेश होता. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आमच्या सीमा अडथळा बनू नयेत, असे मी म्हटले होते. आज मी म्हणू शकतो की आमचे नाते हिट आहे. नेपाळमधील लोकांसाठी नवीन रेल्वे मार्ग सुरू केले जातील. याशिवाय तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
नेपाळचे पंतप्रधान प्रचंड पत्रकार परिषदेत म्हणाले- सीमावादावर माझी मोदींशी चर्चा झाली. मी त्यांना आवाहन करतो की हे प्रकरण द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवावे. त्याचवेळी पीएम प्रचंड यांनी पंतप्रधान मोदींना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
पंतप्रधान प्रचंड यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पीएम प्रचंड यांच्या सन्मानार्थ हैदराबाद हाऊसमध्ये विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचंड दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेतली. 3 जूनला ते एका कार्यक्रमासाठी इंदूरला जाणार आहेत. यानंतर नेपाळी पंतप्रधान महाकालचे शहर उज्जैनला भेट देण्याचीही शक्यता आहे. नेपाळचे पंतप्रधान यापूर्वी मे महिन्यात भारत दौऱ्यावर येणार होते पण मंत्रिमंडळ विस्तारामुळे हा दौरा पुढे ढकलला होता. नेपाळमध्ये अशी परंपरा आहे की, जो कोणी त्या देशाचा पंतप्रधान होतो तो आपल्या परदेश दौऱ्यांची सुरुवात भारतातूनच करतो.
SL/KA/SL
1 June 2023