समृद्धी महामार्गावर आता वेगमर्यादा
आणि श्वास विश्लेषक चाचणी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. त्यासोबतच लहान वाहनांना १२० तर मोठ्या वाहनांना ८० ही वेग मर्यादा घालण्यात येणार आहे.
याबाबतची अर्धा तास चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली होती.
या रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक करणारे चालक दारू पिऊन गाड्या चालवतात , ते लेनची शिस्त पाळत नाहीत , त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक निष्पाप जीव जात आहेत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावर तातडीने आळा घाला अशी त्यांची मागणी होती.
Speed limit now on Samriddhi Highway
and breathalyzer testing
या रस्त्यावर रोज सतरा ते अठरा हजार वाहनांची वाहतूक होत आहे, भविष्यात ही संख्या पन्नास हजार इतकी होणार आहे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व लहान वाहनांना यापुढे १२० प्रती तास तर मोठ्या वाहनांना ८० इतकी वेग मर्यादा घालण्यात येणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केलं. छोट्या वाहनांनाही श्वास विश्लेषक चाचणी करण्याबाबत सभागृहाची भावना लक्षात घेऊन त्यावर विचार करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येईल , जागोजागी मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात येतील असे भुसे यांनी स्पष्ट केले.
सुनील केदार यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर मंत्री उत्तर देत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या दरम्यान जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. गौण खनिजाचे पोटी संबधित कंत्राटदारांकडून १७८२ कोटी रुपये शासनाने महसूल वसूल केला आहे असं मंत्री म्हणाले.
ML/KA/PGB
3 Aug 2023