ठाण्यात वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या एस टी चालकांना दंड…

ठाणे दि १० : ऐन दिवाळीच्या वेळी ST महामंडळातील ठाण्यातील डेपो नंबर एक मधील तब्बल 170 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा दंड कापण्यात आला आहे. वेतनातून तब्बल ४०१२ रुपये कापण्यात आले असल्याची पावती चालकांना देण्यात आली आहे. आणखीन 8024 रुपये दंड थकीत असल्याची माहिती चालकांनी दिली आहे.
महामार्गावर वेगमर्यादा ओलांडण्यामुळे हा दंड आकारण्यात आल्याची माहिती समजली आहे. मात्र ST बसेस मधील स्पीड मीटर च बंद असूज गाडी किती वेगात धावते याचा अंदाज न येण्याचे चालकांचे म्हणणे आहे. ऐन दिवाळीपूर्वी पगारात कपात झाल्याने ST चालकांमध्ये नाराजीची भावना आहे.ML/ML/MS