दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान जाहीर

 दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान जाहीर

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरीक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरीक्त दूध स्विकारून त्याचे दुध भुकटी आणि बटरमध्ये रूपांतरण करून अतिरीक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधाकरीता दुध उत्पादकास प्रतिलिटर रु.5/- अनुदान देण्यात येईल. सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल.

याकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी यांना 3.2 फॅट आणि 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान रु.29/- दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित ( ऑनलाईन पध्दतीने ) अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रु.5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील.

(DBT) डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tagging) लिंक असणे आवश्यक असेल आणि त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.
ही योजना 01 जानेवारी 2024 ते दि.29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहील. तद्नंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवुन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

ML/KA/SL

20 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *