JNU मध्ये सुरु होणार शिवरायांच्या युद्धनीतीचे धडे देणारे विशेष अभ्यास केंद्र

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वारे अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजी, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्राफ्ट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे.
या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.जुलै २०२५ पासून डिप्लोमा, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. जेएनयूमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राचार्य अमिताभ मट्टू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “केंद्र सुरू करण्याची कल्पना कुलगुरू आणि काही प्राध्यापकांकडून आली. महाराष्ट्र सरकारलाही छत्रपतींच्या विचारांचे स्मरण करायचे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सागरी रणनीती यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे.