मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत

 मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी मुंबईत बोलाविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यात सगे सोयरे हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. मनोज जरांगे यासाठीच पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

गेल्या महिन्यात प्रारूप मसुदा तयार करण्यात येऊन कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन देत तसे प्रारूप कायदा प्रसिद्ध केला होता, त्यात हरकती , सूचना देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांसह त्यांच्या सगे सोयाऱ्यानाही त्याचा लाभ देण्याचे यात नमूद करण्यात आले असून ओबीसी समाजाने यालाच हरकती घेतल्या आहेत. याची तरतूदच कायद्यात नसताना त्याचा समावेश करण्यात का आला असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे.

हा मसुदा अंतिम करून त्याला कायद्याचे स्वरूप द्यावे आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने तसेच तातडीने करावी अशी मागणी करीत मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला थांबविणे तसेच सर्वेक्षण करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसी विचारात घेण्यासाठी हे एक दिवसीय विशेष अधिवेशन २० फेब्रुवारीला मुंबईत बोलाविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांनी औषधोपचार करून घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. आज कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते मात्र त्यांनी ते काढून टाकण्यास लावले. सरकारने आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही असे जरांगे यांचे म्हणणे आहे. Special Session of Legislative Assembly for Maratha Reservation in Mumbai

ML/KA/PGB
14 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *