महिला दिनानिमित्त Ola Electric Scooter ची खास ऑफर

 महिला दिनानिमित्त Ola Electric Scooter ची खास ऑफर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला दिनानिमित्त Ola इलेक्ट्रिकने ८ मार्च ते १० मार्च या कालावधीसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर एस १ एअर, एस १ एक्स, एस १ एक्स प्लस आणि एस १ प्रोवर लागू आहे. इलेक्ट्रिक स्कूटरवर २५ हजारांपर्यंत ऑफर देण्यात आली. याशिवाय, महिलांना २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

एस 1 एक्स प्लसची किंमत ८४ हजार ९९९रुपये, एस १ प्रोची किंमत १.३० लाख रुपये आणि एस १ एअरची किंमत १.०५ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, या किंमतींमध्ये ब्रँड संपूर्ण मार्चमध्ये देत असलेल्या विशेष सवलतींचा समावेश आहे.

एस १ एक्सची (४ किलोवॉट) किंमत १ लाख ९ हजार ९९९ रुपये आहे. एस १ एक्सची (२ किलोवॉट) किंमत ७९ हजार ९९९ रुपये आणि एस १ एक्सची (३ किलोवॉट) किंमत ८९ हजार ९९९ रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. ग्राहक आता अ‍ॅड- ऑन वॉरंटीचा पर्याय निवडू शकतात. याव्यतिरिक्त, ओला इलेक्ट्रिकने एप्रिल २०२४ पर्यंत आपल्या सेवा नेटवर्कचा विस्तार सध्याच्या ४१४ सेवा केंद्रांवरून ६०० केंद्रांवर करण्याची योजना जाहीर केली आहे.

ओला इलेक्ट्रिकने फेब्रुवारी २०२३ मध्ये ३५ हजार युनिट्सची नोंदणी केल्याची घोषणा केली. कंपनीने या महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मासिक नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत सुमारे १०० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीचा बाजारातील वाटा ४२ टक्के आहे.

SL/KA/SL

8 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *