श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी विशेष चौकशी समिती
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रध्दा वालकर हत्येपूर्वी घडलेल्या घटनांची चौकशी एक विशेष चौकशी समिती नेमून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली , यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. Special Inquiry Committee in Shraddha Walker murder case
श्रद्धा ला झालेली मारहाण , तिच्या वडिलांनी मागे घेतलेली तक्रार , त्यावेळची पोलिसांची भूमिका , याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव होता का आदी अनेक मुद्द्यांवर ही चौकशी केली जाईल, अतुल भातखळकर यांनी हे मुद्दे उपस्थित केले होते , आशीष शेलार, सुनील प्रभू, अजित पवार यांनी त्यावर प्रश्न विचारले होते.
मुंबईतील अंधेरीचा गोखले पूल धोकादायक ठरवून बंद केल्यानंतर त्याचे काम सुरू व्हायला वेळ का लागला याची चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली, या खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली .पुल पडल्यावर तब्बल दीड वर्षांनी कार्यादेश दिला गेला आणि त्यानंतर ही दीड वर्षांनी काम सुरू झाले , या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी अमित साटम यांनी केली होती. हा पूल बंद केल्यामुळे स्थानिक लोकांना होणारा त्रास , त्यावरील उपाययोजना करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली.
राज्यभरात योजना आखणे सुलभ होण्यासाठी सर्व खाती आणि विभागांची माहिती एका ठिकाणी संकलित करण्याचे काम गतीशक्ती योजनेतून सुरू आहे, ती वर्षभरात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच लक्षवेधी च्या उत्तरात दिली.
विजे संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर फडणीसांचे उत्तर सुरू असतानाच विधानसभा सभागृहात ध्वनी यंत्रणा बंद पडली यामुळे सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं. यंत्रणा पुर्ववत झाल्यावर कामकाज पुन्हा सुरू झालं .
राज्याच्या यापुढील सर्व प्रकारच्या सेवा भरती मध्ये अधिवास दाखला अर्थात डोमिसिल सर्टिफिकेट आवश्यक करण्यात आलं आहे, त्यासाठी सेवा नियमात ही आवश्यक बदल केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर दिली , ऊर्जा विभागातील भरती बाबतची ही सूचना चेतन तुपे यांनी उपस्थित केली होती.
ML/KA/SL
20 Dec. 2022