महिला दिनाला लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट! मिळणार दोन महिन्यांचे पैसे

सरकारने लाडक्या बहिणींना खूशखबर दिली आहे. ८ मार्चला संध्याकाळी या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. तसंच मार्च महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ८ मार्चच्या महिलादिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करुन देणार आहोत.’ येत्या ५-६ मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत”,असे तटकरे यांनी सांगितलं.