भंडारा -गोंदिया लोकसभा मतदार संघात ११ महिला मतदान केंद्राची विशेष सुविधा
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खोकरला येथील मतदान केंद्रावर राष्ट्रीय महोत्सव, ‘मी करणार मतदान, सुस्वागतम्’, अशी वाक्य लिहलेल्या गेटस् उभारण्यात आल्या होत्या. महिलांसाठी बैठक व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी आनंदाने मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करताना दिसून आल्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारण्यात आली होती. त्यावर आम्ही भंडारावासी १०० टक्के मतदान करू, असे वाक्य ठळकपणे लिहले गेले होते. सेल्फी काउंटर फुग्यांनी सजविण्यात आले होते. त्याचखाली ‘ओ भाऊ मी मतदान करणार, तुम्ही पण मतदान करा’, असे आवाहन करण्यात आले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जात होती.
नववधूसारखे सजले मतदान केंद्र
सेंट पॉल स्कूल येथील सखी मतदान केंद्र आकर्षक फुग्यांच्या कमानीने सजविण्यात आले होते. हिरवी मॅट अंधारली गेली होती. नववधूसारखे केंद्र सजविण्यात आले होते. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत भरभरून मतदान केले. सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढून इतरांना मतदानासाठी सोशल माध्यमावरून पाठविले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
महिलांनी सांभाळल्या विविध जबाबदाऱ्या
भंडारा जिल्ह्यात महिलांसाठी ११ विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केेंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होता.
Special facility of 11 women polling stations
ML/ML/PGB
19 Apr 2024