मुंबईतील एक लाख ३४ हजार बालकांना गोवर- रूबेला लसीची विशेष मात्रा

 मुंबईतील एक लाख ३४ हजार बालकांना गोवर- रूबेला लसीची विशेष मात्रा

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवर- रूबेला संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार 1 डिसेंबर पासून मुंबईत ३३ आरोग्य केंद्रांतील नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख ३४ हजार ८३३ बालकांना गोवर- रूबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे. Special dose of Measles-Rubella vaccine to 1 lakh 34 thousand children in Mumbai

केंद्राच्या २३ नोव्हेंबरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे विशेष गोवर- रूबेला लसीकरण 1 डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत ३३ आरोग्य केंद्रांतील नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख ३४ हजार ८३३ बालकांना गोवर- रूबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवरसंसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा आरोग्य केंद्रांतील तीन हजार ४९६ बालकांना ही विशेष मात्रा देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

ML/KA/PGB
29 Nov .2022

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *