Special 26 स्टाईल दरोडा टाकणारी टोळी पोलीसांच्या ताब्यात

 Special 26 स्टाईल दरोडा टाकणारी टोळी पोलीसांच्या ताब्यात

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या भूमिका असलेला Special 26 हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल. यामध्ये अँटी करप्शन डिपार्टमेंटची धाड असल्याचे भासवून व्यापाऱ्यांवर दरोडे
टाकून शिताफीने पलायन करणाऱ्या गुन्हेगारांची रंजक कथा मांडली आहे. अशा चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका, तसेच वेबसिरिजमधले प्रसंग पाहून गुन्हा करण्याचे प्लॅन झाल्याचे प्रसंगही अनेकदा घडून येतात. नवी मुंबईमध्ये Special 26 चित्रपटाच्या कथेप्रमाणे एक दरोड्याचा गुन्हा घडल्याचे उघडकीस आले आहे.

एका गुन्हेगारी गँगने ‘स्पेशल 26’ चित्रपट पाहून प्लान बनवला. या टोळीने नवी मुंबईतील बड्या व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकली आहे. अवघ्या तासाभरात या गँगने 34 लाखांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना अटक केली आहे. अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून कांतीलाल यादव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपींना रबाळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. स्पेशल 26 हा चित्रपट पाहून या आरोपींनी तंतोतंत त्या चित्रपटाप्रमाणे केवळ सव्वा तासात ही धाड टाकण्याची किमया केली आहे.

6 जणांनी मिळून ही धाड टाकत घरातील 34 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी कांतीलाल यादव यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. रबाळे पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपास करत गुन्ह्यात सहभागी एकूण 11 जणांना केले आहे. आरोपींकडून केलेल्या चौकशीत कार, रोख रक्कम, पिस्टल असा एकुण 25 लाख 25 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत असून पोलीस याप्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.
SL/KA/SL

1 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *