Special 26 स्टाईल लुटमार करणारी टोळी मुंबई पोलिसांकडून जेरबंद

 Special 26 स्टाईल लुटमार करणारी टोळी मुंबई पोलिसांकडून जेरबंद

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अक्षय कुमार,अनुपम खेर, जिमी शेरगिल आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला Special 26 हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल. इन्कमटॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत ही टोळी धनाढ्य लोकांकडे डाके टाकत शिताफीने पोबारा करत असल्याचे यात दाखवले आहे. या पद्धतीने लुटमार करणाऱ्या एका टोळीला आज मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीच्या कामात आजी माजी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समजल्याने पोलीसदल हैराण झाले आहे.माटुंग्यातील प्रसिद्ध म्हैसूर कॅफेच्या व्यावसायिकांला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडणाऱ्यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली . या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार ‘स्पेशल 26’ या चित्रपटाप्रमाणेच आरोपींनी कट रचला होता. बाबासाहेब भागवत (50), दिनकर साळवे (60),वसंत नाईक (52), शाम गायकवाड (52),नीरज खंडागळे (35) आणि सागर रेडेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीत आणखी काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. ‘स्पेशल 26’ चित्रपटात दाखवलेल्या एका सीनप्रमाणे आरोपींनी निवडणुकीच्या काळात चोरीचा कट रचला होता. यातील वसंत नाईक हा मुख्य आरोपी असून वर्षभरापूर्वी त्याला म्हैसूर कॅफेतून काढून टाकले होते. मालकाच्या अत्यंत जवळचा व्यक्ती असल्याने मालकाच्या घरात दररोज येणाऱ्या पैशांची माहिती त्याला होती. मालकाने कामावरुन काढल्याचा राग त्याच्या मनात होता. हाच राग मनात ठेवत आरोपीने लुटीचा कट रचला होता. म्हैसूर कॅफेच्या मालकाच्या घरी रक्कम ठेवलेली असते हे आरोपी वसंत नाईकाला माहित होते. त्याने मालकाला आपल्या डोक्यात सुरू असलेली लुटीची योजना सांगितले. साथीदारांना देखील हा कट आवडला त्यांनी देखील तयारी दाखवली.

म्हैसूर कॅफेच्या मालकाच्या घरी मोठी रक्कम असेल त्या दिवशी अधिकारी बनून जायचे आणि लूट करण्याचा बेत आखण्यात आला.अशातच कॅफे म्हैसूर मालकाच्या घरी 20 कोटींची रोकड पक्की खबर या टोळीला मिळाली. सोमवारी 13 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एक बनावट पोलीस व्हॅन आणि खाजगी कारमधून कॅफेच्या मालकाच्या घरी पोहचले. बनावट पोलीस ओळखपत्र दाखवत आम्ही क्राईम ब्रांन्चचे अधिकारी आहे. तुमच्या घरात निवडणुकीची रोकड असल्याची टीप मिळाली आहे, असे बोलून घराची झडती घेऊन कपाटातील 25 लाख रुपयाची रोकड दाखवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर 25 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. आता या बदमाशांना मुंबई पोलीसांनी जेरबंद केले आहे.

SL/ML/SL

16 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *