स्पेनने विक्रमी चौथ्यांदा युरो कप जिंकला
बर्लिन, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरो कप फुटबॉल २०२४ चा अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंडच्या संघात रोमहर्षक लढत पहायला मिळाली. अखेरीस स्पॅनिश संघाने अंतिम सामना २-१ने जिंकला आणि विजेतेपदावरही आपले नाव कोरले. यासह स्पेन ४ वेळा युरो कप जिंकणारा पहिला देश बनला आहे. मात्र, चौथी ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
युरो कप २०२४ चा अंतिम सामना १५ जुलै रोजी बर्लिन, जर्मनी येथे स्पेन आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. स्पेनने चौथ्यांदा युरो कपचे विजेतेपद पटकावले आहे. इतर कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या वेळा युरो कप जिंकलेला नाही. २०२० च्या युरो कपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर आता इंग्लंडला २०२४ च्या युरो कपच्या फायनलमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडला आतापर्यंत युरो चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळालेले नाही.
सामना १-१ असा बरोबरीत आणत इंग्लंडने अतिशय आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. खेळाच्या ८६व्या मिनिटाला स्पेनचा अनुभवी खेळाडू ओयारझाबालने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त वेळेसाठी दिलेल्या ४ मिनिटांतही इंग्लंडचा संघ एकही गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही
SL/ML/SL
15 July 2024