सोयाबीन-कापूस आयात होणार नाही – मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
मुंबई, दि. 14 : अमेरिकेशी झालेल्या महत्त्वाच्या व्यापार करारानंतर आता भारतीय बाजारपेठ अमेरिकन मालासाठी खुली झाली आहे. परिणामी देशातील शेतकरी वर्गाच्या मनात चिंता निर्माण झाली असून यामुळे देशी शेतमालाला भाव मिळणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांना आश्वस्त केले. फडणवीस म्हणाले की, राज्यात सोयाबीनला चांगला भाव मिळू लागला असताना काही लोकांनी अमेरिकेचे सोयाबीन भारतात येणार असल्याची अफवा पसरवली. या अफवेमुळे सोयाबीनचे दर सुमारे 500 रुपयांनी घसरले, असा दावा त्यांनी केला. “भारत-अमेरिका करारात कुठेही सोयाबीन किंवा कापूस आयात करण्याबाबत उल्लेख नाही. कोणतेही सोयाबीन किंवा कापूस परदेशातून येणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच कृषी क्षेत्राबाबत कोणताही करार होणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. काही मतप्रवाह जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असा टोला लगावत फडणवीस यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.
SL/ML/SL