सोयाबीन कापणीला सुरुवात; मजुरांची वानवा ….
वाशिम, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाशिम जिल्ह्यात सोयाबीन कापणीला वेग आला असून, जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत. मात्र, स्थानिक मजुरांची टंचाई असल्याने बाहेरील जिल्ह्यांमधून आणि परराज्यातील मजूर वाशीममध्ये दाखल झाले आहेत. राज्यात सोयाबीनचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली पुरेसा पाऊस आणि पोषक हवामानामुळे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता आहे.
सोयाबिन कापणीच्या हंगामात मजुरांची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांना परराज्यातील मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, सोयाबीन कापण्यासाठी मजुरांची मागणी मोठी असल्यामुळे कापणीसाठी मजुरी दर ५०० ते ६०० रुपये प्रतिदिन मिळत आहे
ML/ML/PGB
30 Sep 2024